आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मानांकन टेनिस स्पर्धा:सोलापूरचा स्पर्श पाटील, मुंबईच्या रुमी गदियाने पटकावले विजेतेपद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य टेनिस संघटने तर्फे सुहाना स्मार्ट राज्य ज्युनिअर मानांकन टेनिस स्पर्धा नाशिक जिल्हा संघटने द्वारे नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विविध भागातून दहा वर्ष वयोगटातील मुले व मुली या स्पर्धेत सहभागी झाले होते. यात सोलापूरच्या स्पर्श पाटीलने तर मुलीमध्ये नवी मुंबईच्या रुमी गदियाने विजेते पद मिळविले व गुण मिळवून आपले राज्य मानांकन स्थान वरती नेले.

विजेतेपद मिळवितांना स्पर्धेच्या अंतिम फेरी मध्ये सोलापूरच्या स्पर्श पाटील याने आक्रमक खेळाच्या जोरावर नाशिकच्या अर्चन पाठक वर 4-2,4-0 असा विजय मिळविला तर मुंबईच्या रूमी गदियाने अत्यंत संतुलित परंतू सातत्य पूर्ण खेळ करत नाशिकच्या अनिका श्रीवास्तवर 4-1,4-1 अशी मात करुण स्पर्धेचे विजेते पद मिळविले विशेष म्हणजे दोन्ही गटात नाशिकच्या खेळाडूंनी अंतिम फेरी पर्यंत मजल मारली व उप विजेते पद मिळवून स्पर्धा आयोजकांचा उद्देश सार्थ ठरविला.

विजेत्या खेळाडूंना जिल्हा टेनिस संघटनेचे माजी उपाध्यक्ष व जेष्ठ टेनिस पटू गोविंद बेळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना राज्य संघटनेचे मानांकन गूण व सुहाना स्मार्ट सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमूख पाहुणे गोविंद बेळे व स्पर्धा निरीक्षक अपूर्वा रोकडे यांचे स्वागत जिल्हा संघटनेचे खजिनदार समीर कपूर यांनी केले तर स्पर्धा संचालक अद्वैत आगाशे यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे गोविंद बेळे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अँड. जयदीप वैशंपायन यांनी करतांना सदर स्पर्धा आयोजना करिता संघटना अध्यक्ष व राज्य संघटना उप. कार्याध्यक्ष राजीव देशपांडे व राष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले स्पर्धा यशस्वी करण्या करिता गोरख खैरनार ,गोविंद साळुंखे ,आदींनी प्रयत्न केले. सदर प्रसंगी नाशिक मधिल विविध ठिकाणी खेळणारे टेनिस खेळाडू पालक टेनिस प्रेमी उपस्थित होते व नाशिक जिल्हा टेनिस संघटनेच्या माध्यमातून अधिका अधिक स्पर्धा आयोजित होतील असा विश्वास व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...