आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज संकट:औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांचे नूतनीकरण राज्याने गुंडाळले, सात कालबाह्य संचांमधील वीजनिर्मिती ठप्प

नाशिक / अभिजित कुलकर्णी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजेचे दर घटवण्यासाठी कंपन्यांचे मूल्यमापन : ऊर्जामंत्री

तामिळनाडूतील नेयवेली औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता महाराष्ट्रातील कालबाह्य औष्णिक विद्युत संचांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या निकषानुसार २५ वर्षांची कालमर्यादा पूर्ण केलेले राज्यातील ७ प्रकल्प कालबाह्य ठरले आहेत. यापैकी काहींनी तर चाळिशीही ओलांडली आहे. मे २०१९ पर्यंत ते पूर्णत: रद्द करावेत वा त्यांचे नूतनीकरण करावे, ही प्राधिकरणाची शिफारसही धाब्यावर बसवण्यात आली आहे.

या कालबाह्य संचांच्या नूतनीकरणाचा खर्च प्रत्येकी ४०० ते ४५० कोटींच्या घरात असल्याने तसेच त्यानंतरही निर्माण होणारी वीज महाग पडत असल्याने कोणत्याही औष्णिक विद्युत संचाचे नूतनीकरण केले जाणार नाही, असे स्पष्ट धोरण राज्य शासनाचे आहे. मात्र, कामगार संघटनांच्या दबावामुळे हे संच कायमस्वरूपी बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय टाळला जात असल्याने वार्षिक दुरुस्ती व देखभाल दाखवून ते सुरक्षित असल्याचे सांगितले जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. मुळात महागड्या दरांमुळे यापैकी ५ संच दीड-दोन वर्षांपासून बंदच आहेत. २ संच लॉकडाऊनमध्ये वीजेची मागणी आटल्याने सध्या बंद आहेत.

नाशिकच्या एकलहरे केंद्रातील युनिट-तीन २५ मार्चपासून बंद आहे. भुसावळच्या एका युनिटमधील वीजनिर्मिती २३ मार्चपासून बंद आहे. दीड-दोन वर्षांपासून अन्य केंद्रांतील वीजनिर्मिती ठप्प आहे. यामागे प्रामुख्याने ही युनिट्स कालबाह्य झाल्याने त्यांची कार्यक्षमता घटणे व पर्यायाने येथे उत्पादित वीज महाग पडणे ही कारणे आहेत. यामुळे कालबाह्य विद्युत संच नूतनीकरणाचे प्रस्ताव शासनाने गुंडाळले.

सर्व विद्युत निर्मिती केंद्रे चाळिशीच्या उंबरठ्यावर

नाशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील युनिट ४ ला याच महिन्यात चाळीस वर्षे पूर्ण झाली. १९८८ सालच्या जुलै महिन्यात त्याची उभारणी करण्यात आली होती. येथील युनिट ३ ला ४१ वर्षे झाली आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील खापरखेडा युनिट १ (३१ वर्षे), कोराडी युनिट ६ (३८ वर्षे), कोराडी युनिट ७ (३७ वर्षे) आणि भुसावळ युनिट ३ (३८ वर्षे) या प्रकल्पांनी पंचवीस वर्षांची वयोमर्यादा केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे या केंद्रांमधून निर्मित वीज महाग पडत आहे.

नाशिकच्या एकलहरे केंद्रातील युनिट-तीन २५ मार्चपासून बंद आहे. भुसावळच्या एका युनिटमधील वीजनिर्मिती २३ मार्चपासून बंद आहे. दीड-दोन वर्षांपासून अन्य केंद्रांतील वीजनिर्मिती ठप्प आहे. यामागे प्रामुख्याने ही युनिट्स कालबाह्य झाल्याने त्यांची कार्यक्षमता घटणे व पर्यायाने येथे उत्पादित वीज महाग पडणे ही कारणे आहेत. यामुळे कालबाह्य विद्युत संच नूतनीकरणाचे प्रस्ताव शासनाने गुंडाळले. कोराडी केंद्रात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू केलेले नूतनीकरणाचे काम थांबवले आहे. त्यानुसार नाशिकसह अन्य सातही कालबाह्य संचांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

जुन्या औष्णिक प्रकल्पांच्या नूतनीकरणास स्थगिती

ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, जुन्या प्रकल्पांच्या नूतनीकरणावर प्रत्येकी ४०० - ४५० कोटी खर्च केल्यानंतरही निर्माण होणारी वीज तीन ते चार रुपये युनिट एवढी महाग पडते आहे. सध्या बाजारात अडीच रुपये दराने वीज उपलब्ध असल्याने जुन्या औष्णिक विद्युत प्रकल्पांचे नूतनीकरण करायचे नाही असा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याऐवजी सोलार वीजनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. आगामी अधिवेशनात ते धोरण मांडण्यात येणार आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित सर्व वीजनिर्मिती, वीज वितरण कंपन्यांचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. ग्राहकाला कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादित विजेचे दरही कोणत्याही परिस्थिती कमीच असावेत अशी राज्याची भूमिका आहे.

कामगारांच्या मागणीमुळे दीपनगरातील प्रकल्प सुरूच

दीपनगरातील ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल कोळसाधिष्ठित प्रकल्प कार्यान्वित होत नाही तोपर्यंत संच क्रमांक तीन कायमस्वरूपी बंद करू नये, अशी कामगारांची मागणी आहे, तर दुसरीकडे हा संच एमओडीमध्ये असल्याने त्यातून होणारी वीज महागडी आहे. यामुळे बंदच असतो. राज्याची अचानक डिमांड वाढल्यास यातून वीजनिर्मिती होऊ शकते. यामुळे तो कायमस्वरूपी बंद केला जात नाही. तसेच राज्याची स्थापित क्षमता कायम ठेवण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू होत नाहीत तोपर्यंत जुने बंद करता येणार नाही, अशी माहिती भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

केंद्राचे नाव  युनिट  स्थापना वयोमर्यादा

खापरखेडा युनिट, १ मार्च १९८९, ३१ वर्षे

नाशिक युनिट, ३ एप्रिल १९७९, ४१ वर्षे

नाशिक युनिट, ४ जुलै १९८०, ४० वर्षे

नाशिक युनिट, ५ जाने १९८१, ३९ वर्षे

कोराडी युनिट, ६ मार्च १९८२, ३८ वर्षे

कोराडी युनिट, ७ जाने. १९८३, ३७ वर्षे

भुसावळ युनिट, ३ सप्टेबर १९८२, ३८ वर्ष

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser