आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅन्टोन्मेंट बोर्डातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी रक्षा संपदाचे माध्यम फायद्याचे ठरत असल्याचे प्रतिपादन कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर यांनी केले. १६ डिसेंबर हा दिवस देशभरात रक्षा संपदा दिवस म्हणून साजरा करण्यात येताे. त्यानिमित्ताने देवळालीच्या कॅन्टोन्मेन्ट बोर्ड कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विवेक बंड, सत्येंद्र तेजाळे, विलास पाटील, स्वप्नील क्षत्रिय, निरज साहू, वसंत शरमाळे, संतोष पवार, पीयूष पाटील, शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, कैलास मेतकर, ज्योती वावरे, नीलेश चौधरी, समाधान नरोटे, तेजस जाधव, सागर छड्डीदार, वासू पगारे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होत.
प्रास्ताविकातून गोरवाडकर यांनी कार्यक्रमाची माहिती विशद केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळांमध्ये आयोजित चaित्रकला स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर रंगभरण स्पर्धेत व निबंध स्पर्धेत ७० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. यावेळी प्राचार्य राजेंद्र यशवंते, विष्णू वाघ व सर्व शिक्षक उपस्थित होते. संरक्षण वसाहतीच्या वतीने रक्षा संपदा दिनानिमित्ताने येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या तपासणी शिबिराचा शुभारंभ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री नटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. मनीषा होनराव, डॉ. चंद्रकांत बावस्कर, डॉ. हेमंत गवळी, देवी लखमियानी, सुरेखा माळोदे, सोनल गोडसे आदी उपस्थित होते. दरम्यान, येणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील साखर व रक्तदाब आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.