आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय:शालेय विद्यार्थ्यांसाठी शहर वाहतूक बसेससाठी निवेदन; तिन हजार विद्यार्थी घेतात शिक्षण

देवळाली कॅम्प11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील धोंडी रोडवरील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचालित संस्थेच्या परिसरात तीन शाळा दोन सत्रांत भरतात. या शाळांमध्ये ग्रामीण भागासह परिसरातून विद्यार्थी येतात, मात्र येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी शहर वाहतूक बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांच्याकडे मागणी केली. या तिन्ही शाळांमधून ३ हजार ५०० विद्यार्थी दोन्ही माध्यमातून शिक्षण घेत आहे. संसारी, नाशिकरोड, वडनेर, लहवित, भगूर, देवळाली कॅम्प, वंजारवाडी, पिंपळगाव, पाथर्डी, वाडीचे रान, साकुर या गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सर्वच विद्यार्थ्यांना खासगी वाहन परवडत नसल्याने त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मनपाच्या शहर वाहतूक बसेस या मार्गावर सुरू कराव्यात असे निवेदन केशव पोरजे, त्र्यंबक पोरजे, संजय गायकर, कारभारी पोरजे, भास्कर पोरजे, राजाराम कोकण यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...