आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यावसायिकांचे बस्तान:हॉटेल जत्रा चौफुलीवरील अतिक्रमण काढा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा इशारा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावरील हॉटेल जत्रा चौफुलीवर वाढते अतिक्रमनामुळे परिसरात गुंडगीरी वाढत असल्याने या परिसरातील अतिक्रमन काढण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार दि.6 रोजी सायंकाळी 4 वाजता अतिक्रमन विभागाच्या उपआयुक्तांना निवेदन देण्यात आले. अतिक्रमन काढले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

जत्रा चौफुलीवर खाद्य पदार्थ्यांच्या हातगाड्यांचे अतिक्रमन वाढले आहे. याठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यावसायिकांना आपले बस्तान बसवल्याने येथे गुंडगीरी वाढत आहे. परिसरातील नागरिकांना या हातगाडी चालकांकडून अरेरावी केली जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपुर्वी अंडा रोलची ऑर्डर उशिरा दिली म्हणून एका पोलिस पुत्राने हातगाडी चालकाला विचारले असता त्याने त्याचे पोलिस पुत्र मित्रांना बोलवून घेत तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याची गाडी फोडून टाकली होती. आडगाव पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची दखल घेत शिवसेनेचे बालाजी माळोदे, सुनिल जाधव, अॅड.दिपक मते, अतुल मते, गणेश माळोदे, पोपट शिंदे, संदीप लभडे, यांच्यासह आडगाव, कोणार्क नगर, आणि जत्रा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...