आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विधवा दिनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; योजनांची दिली माहिती

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक विधवा दिनाचे औचित्य साधत विधवांनी एकत्र येत विधवांसाठी सन्मान व संरक्षण कायदा निर्माण करण्याची मागणी केली. यासंदर्भात सुरू करण्यात आलेल्या अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

समाजात असणाऱ्या अनिष्ट रुढी पंरपरा जर थांबवायच्या असतील तर “विधवा महिला सन्मान व सरंक्षण कायदा’ शक्य तेवढ्या लवकर अस्तित्वात यावा व हा कायदा जो पर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत हा लढा शांततेच्या मार्गाने सुरुच राहील अशी माहीती “विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाचे राज्य निमंत्रक राजु शिरसाठ यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तर विधवा महिलांना हळदी-कुंकु देत यापुढे या महिलांनी विधवा म्हणून न जगता सन्मानाने स्री म्हणून जगण्याचे आवाहन शोभा काळे यांनी केले. निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले.