आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:'घरी राहा आणि कोरोना टाळा' राज्यात कोरोनापीडितांमध्ये महिलांचा टक्का कमी

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील महिलांनी सिद्ध केला बचावाचा उपाय

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे जाहीर करण्यात येणारा राज्यातील कोरोनाबाबतचा तिसरा सांख्यिकी अहवाल जाहीर झाला असून, कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू या दोन्हीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या लक्षणीय कमी असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त ४० टक्के आहे, तर दगावलेल्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या ३५ टक्के आहे. 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अकराव्या आठवड्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण खात्याने जाहीर केला आहे. आतापर्यंत राज्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ६० टक्के पुरुष असल्याचे व ४० टक्के स्त्रिया असल्याचे यातून पुढे आले आहे. फक्त रुग्णच  नाही तर मृतांच्या बाबतीतही हाच ट्रेंड दिसून येतो आहे.

कोरोनामुळे दगावलेल्या १६० रुग्णांपैकी ६५ टक्के पुरुष होते तर ३५ टक्के महिला असल्याचे हा अहवाल सांगतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे घरात राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने तोच कोरोनाच्या प्रतिबंधास खात्रीशीर आधार असल्याचे या अहवालातूनही पुढे आलेले दिसते.

महिलांना तुलनेत धोका कमी 

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे घराबाहेरील चलनवलन कमी असल्याने पुरुषांच्या तुलनेत महिलांना कोरोनाची बाधा आणि धोका कमी असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. सर्वांसाठीच ही मोठी शिकवण व संदेश आहे. घरात राहणाऱ्यांचा या संसर्गापासून बचाव होत आहे, बाहेर पडणाऱ्यांना संसर्ग होत आहे. - डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय.

जागतिक मृत्यूदर ओलांडला

महाराष्ट्राने कोरोना जागतिक मृत्यूदराची सीमा ओलांडली आहे. कोरोनाचा जागतिक मृत्यूदर ६.२९ असताना महाराष्ट्रात हे प्रमाण ६.८४ वर पोहोचले आहे. दर हजार रुग्णांमागील मृत्यूच्या संख्येवरून हा मृत्यूदर ठरवला जातो. जगातील कोरोनाबधितांंचा मृत्यूदर ६.२९ आहे. राज्य शासनातर्फे हा मृत्यूदर रोखण्यासाठी विशेष समिती तयार केली आहे. देशाचा मृत्यूदर ३.२७ आहे. देशात झारखंडचा मृत्यूदर सर्वात अधिक दिसत असला तरी तेथे फक्त २ मृत्यू आहेत. दुसऱ्या क्रमांकांवरील मध्य प्रदेशचा मृत्यूदर ७.१२ आहे. मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असली तरी मृत्यूदराबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...