आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजर नव्हे, तर बिबट्याचा बछडा:कुटुंबासोबत बिबट्याच्या बछड्याचा आठवडाभर घरात मुक्काम, दीड वर्षाच्या मुलीची जमली गट्टी

मालेगाव \ शंकर वाघ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगावच्या मोरदर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांच्या शेतातील घरासमोर बच्चे कंपनीला जणू मांजर सापडली या आनंदात सर्वजण तिच्याशी खेळू लागले. यथावकाश या मुलांची तिच्याशी गट्टी जमली. मात्र, घरातल्या मोठ्यांनी या पाहुण्याला न्याहाळले तेव्हा ती मांजर नव्हे, तर बिबट्याचा बछडा असल्याचे लक्षात आले.

यानंतर काहीसे सावध झालेले कुटुंब बछड्याच्या आईची वाट पाहू लागले. मात्र ती न आल्याने जवळपास ८ दिवस ठाकरे कुटुंबाने बछड्याला रोज दीड लिटर दूध पाजत सांभाळ केला. या काळात ठाकरे यांची दीड वर्षाची नात तन्वीला बछड्याचा लळा लागला. अखेर बछड्याला वन विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

बातम्या आणखी आहेत...