आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमानुष मारहाण:आई आणि मावशीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, मूकबधीर मुलाचा क्रूर छळ करत गुप्तांगाला दिले चटके

दिंडोरी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे

'माय मरो, पण मावशी जगो', अशी मराठीत म्हण आहे. पण, आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे घडली आहे. मूकबधीर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केल्याची घटना व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आली. या घटनेतील जखमी बालकावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिंडोरी पोलिसांनी महिलेस अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याच्या सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली, अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केला. ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्यास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले. तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...