आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा:आयटीआयच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकाची अद्यापही प्रतीक्षा

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत २०१४ ते २०२१ या कालावधीत औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेतलेल्या परंतु उत्तीर्ण होऊ न शकलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी २५ नोव्हेंबरपासून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र त्याबाबत कुठलेेही वेळापत्रक किंवा माहितीच स्थानिक आयटीआयला प्राप्त झाली नसल्याने ही परीक्षा आजपासून सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महासंचालनालयामार्फत देण्यात आलेल्या या संधीनुसार पुरवणी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक प्रवेशपत्रही अद्याप संबंधित विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे ते केव्हा होतील असाही प्रश्न आहेत. दरम्यान, २०१७ ते २०२२ पर्यंत परीक्षा पद्धतीत अनेक बदल झालेत. सुरुवातीला लेखी, नंतर ओएमआर शीट आणि नंतर ऑनलाइन असे बदल होत गेले. यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना ते नोकरी करत असलेल्या ठिकाणी पदोन्नत, बढती, वेतनवाढ यासाठी पदवी प्रमाणपत्राची अनेकदा आवश्यकता भासत होती. परंतु विशिष्ट कालावधी उलटल्याने अनेकांना यापासून वंचित रहावे लागले होते. आता मात्र त्यांना ही परीक्षा संधी देण्यात आली असली तरीही वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेच नाही.

बातम्या आणखी आहेत...