आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश वितरीत करण्याच्या सूचना:स्वातंत्र्य दिन तोंडावर तरीही विद्यार्थी गणवेशाविना

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या शाळा सुरू होऊन ७५ दिवस उलटले विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळालेला नाही. ९ ऑगष्टला सुरू हाेणाऱ्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ ला साध्या गणवेशात जायचे की जुन्या असा प्रश्न विद्यार्थ्याना पडला आहे.

पालिका शाळेत ३० हजार ५२३ विद्यार्थी शिकतात. यात पहिली ते आठवी २० हजार ३८, सहावी ते दहावी तीन हजार २७ विद्यार्थी तर खुला व इतर मागासवर्गीय घटकातील ७ हजार ४५८ विद्यार्थी शिकतात. यातील अनुसूचित जाती व जमातीच्या २० हजार ३८ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून गणवेश प्राप्त होतो. उर्वरित गणवेश पालिका देते. सर्व प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी हाेणे अपेक्षित होते मात्र, स्वातंत्र्य दिन तोंडावर आला तरीही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले नाही. याबाबत शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले की, ८ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...