आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत रात्री घरांवर दगडफेक:2 रहिवाशी जखमी, उदय कॉलनी, तोरणानगर भागातील प्रकार, शिवीगाळ अन् मारहाणीचे प्रकारही

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको परिसरातील गुंडगिरी कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. उदय कॉलनी, तोरणा नगर भागात रात्रीच्या सुमारास गुंडांनी रस्त्यातील नागरिकांच्या दुचाकी पाडत तसेच घरांवर दगडफेक करीत शिवीगाळ केली. काही नागरिकांच्या थेट घरात घुसून मारहाणीचा प्रकार घडला.

दरम्यान, असाच प्रकार राणा प्रताप चौकात महिनाभरापूर्वी घडला होता. वेळीच अंबड पोलिसांनी कारवाई केली असती तर कदाचित या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. उदय कॉलनी, तोरणानगर भागातील चौकात गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ६ ते ७ गुंड मद्यपान करून दुचाकीवर आले होते. त्यांनी रस्त्यात दिसतील त्या दुचाकी पाडल्याने नेमके काय झाले म्हणून नागरिकांनी घरातील दरवाजे उघडताच त्यांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली.

रहिवाशी प्रवीण घोरपडे हे काय झाले म्हणून बाहेर पडताच गुंडांनी त्यांच्या घरात घुसून शिवागीळ करीत मारहाण केली. घरातील महिला साेडविण्यासाठी गेल्या असता त्यांनाही या गुंडांनी त्यांच्या घरात घुसून शिवागीळ करीत मारहाण केली. यात त्यांच्या घरातील महिलांवर हल्ला करण्यात आला. त्यात प्रवीण यांच्यासह त्यांचा वहिनी रेखा घोरपडे या ही जखमी झाल्या.

सिडकोतील सर्वसामान्य नागरिकांना गुंडांबद्दल भीती आहेच मात्र पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप होत असल्याने अनेक घटना घडूनही नागरिक तक्रारी द्यायला येत नसल्याचे चित्र आहे. या मंडलातील उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्त कोण? हे ही नागरिकांना माहीत नसल्याने या आधिका-यांची जबाबदारी काय? पोलीस व नागरिक संवाद होत नसल्याने असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

''थेट घरात घुसून मारहाण केली - रात्री बाहेर शिवागीळ व गाड्या पाडण्याचा आवाज आला म्हणून बाहेर आलो तर ते गुंड परत मागे आले आणि घरात घुसून मारहाण केली. घरातील महिलांना सुद्धा मारहाण केली. ते कोण होते आम्ही त्यांना ओळखत नाही. रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत पोलीस स्टेशनला होतो.'' - प्रवीण घोरपडे, जखमी.

बातम्या आणखी आहेत...