आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बंद करो, बंद करो नशे का धंदा बंद करो’:मुस्लीम बांधवांचा अमली पदार्थ सेवन-विक्री विरोधात एल्गार;  'मुखालिफ रॅली'त हजारोंचा सहभाग

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधव व धर्मगुरू, उलेमांकडून सुरु करण्यात आलेली 'ड्रग्ज फ्री नाशिक' मोहीमे अंतर्गत रविवारी(दि. 2) काढण्यात आलेली नशामुखालीफ जनजागृती रॅलीत शहरातील उर्दू शाळा, महाविद्यालयांसह मदरशांचे विद्यार्थी आपापल्या पोशाखात सहभागी झाले.

शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समुदायाकडून सर्व धर्मगुरुंच्या मार्गदर्शनाने अमली पदार्थांची खरेदी, विक्रीविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.

नशा मुक्तीकरीता जुलूस

ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभुमीवर शहर व परिसरात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांना शहरातील बहुतांश सामाजिक संघटनांनी एकत्र येत सुरुवात केली आहे. सर्व धर्मगुरू, उलेमांनी मार्गदर्शनाखाली नशामुक्त अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत वडाळागावानंतर जुने नाशिकमधील चौकमंडई येथून रविवारी सकाळी ‘नशा मुक्तीकरीता जुलूस काढण्यात आला.

दुवा मागितली

प्रारंभी खतीब ए शहर हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब यांनी शहरासह राज्य व देश नशामुक्त व्हावा, सर्वांनी गुण्यागोविंदाने निरामय आरोग्य जगावे आणि देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान द्यावे, याकरिता ‘दुवा’ मागितली. यानंतर फेरीला प्रारंभ करण्यात आला.

प्रबोधनाला सुरुवात

चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, मिरादातार दर्गामार्गे, आझाद चौकातून चव्हाटा, पठाणपुरा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकातून मार्गस्थ होत पिंजारघाटरोडवरून बडी दर्गाच्या प्रारंगणात या नशामुक्ती जुलूसची सांगता करण्यात आली. यावेळी येथे उभारण्यास आल्या मंचावरून हिसामुद्दीन खतीब व मुबईहुन आलेले नशा मुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. इम्रान शेख यांच्यासह विविध धर्मगुरूंनी आपले विचार व्यक्त करत नशेच्या आहारी जाण्याचे नुकसान याविषयी प्रबोधन केले.

यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्ता जाधव यांच्यासह पोलिसांचा या फेरीला बंदोबस्त होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना फैय्याज बरकाती यांनी केले तर आभार मौलाना इब्राहीम यांनी मानले.

विविध घोषवाक्याचे फलक

‘बंद करो, बंद करो नशे का धंदा बंद करो...’, ‘मै उम्मती हुं इसलिये नशे के खिलाफ खडा हुं’, ‘ड्रग्ज फ्री नाशिक’, नशे का हम करे मिलकर नाश’, असे विविध घोषवाक्यांचे फलक हाती.

अमली पदार्थ विक्रेते-नशेखोरांवर बहिष्कार

समाज व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग होण्याची गरज आहे. जे लोक अमली पदार्थ विक्री करतात, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कुराण व हदीसमधून आपल्याला याबाबत मार्गदर्शन मिळते. या लोकचळवळीत सहभागी होऊन नाशिक व्यसनमुक्त करू या, अशी साद धर्मगुरू हजरत मौलाना जुनैद आलम साहब यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...