आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य नागरिक दहशतीखाली:नाशिकमधील गुन्हेगारीसोबत अवैध धंदे बंद करा; राष्ट्रवादी युवकचे पोलिस आयुक्तांना साकडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना साकडे घातले आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शादाब सैय्यद यांनी शिष्टमंडळ सोबत पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मागील एक महिन्यापासुन नाशिक शहरात वाढत्या घरफोड्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. महिलांचे मंगळसूत्र चोऱ्या, खुनाचे सत्र देखील सुरूच आहे. अवैधरित्या चरस अफिम गांजा गुटखा अंमली पदार्थ विक्री करणारे गुन्हे सुध्दा दिवसेंदिवस वाढतच आहे.

परिणामी सामान्य जनजीवन दहशती खाली आहे. सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्यासंदर्भात आपल्या नाशिक पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरच नाशिक शहर हे गुन्हेगारी मुक्त करावा. याशिवाय हेल्मेट सक्तीच्या नावाखाली ट्रैफिक पोलिसांकडून टू व्हीलर थांबून अवाजवी दंड वसूल करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटत आहे.

हेल्मेट सक्ती असणे देखील गरजेचे आहेच, पण आपण नाशिक शहरात हेल्मेट संदर्भात जनजागृती करून लोकांना त्याचे महत्व पटवून दिले तर नक्की पोलीस अधिकाऱ्यांबद्दल शहरातल्या जनतेचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल व पोलिसांबद्दल एक आदराची भावना निर्माण होईल. सध्या नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच घरफोडी करून दरोडा टाकण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नाशिक शहरात सध्या गांजा चरस अफिम घुटखा अमली पदार्थ विकणारी टोळी देखील सक्रिय आहे, असे विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत चालली असून आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की सध्या नाशिक शहरातले युवक ज्या युवकांना आपण देशाचा भविष्य समजतो तो युवक आज अमली पदार्थांमुळे त्यांचे आयुष्य उद्धस्त होण्याची वेळ आली आहे.

नाशिक शहर हे एक तीर्थक्षेत्र असून आपल्या पवित्र भूमीत जे असल्या प्रकारचे चुकीचे व्यवसाय होत असतील, तर नाशिक शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आपल्या तीर्थ भूमीकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलण्यास नाही. लागणार वेळ ही बाब लक्षात घेऊन आपण गुन्हेगारीच्या मुसक्या आवळून अवैध धंद्यानाही चाप लावण्यासाठी पावले उचलावीत. अन्यथा जनहिताचा विचार करून महिलांमध्ये व नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही या निवेदनात दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...