आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Nashik
 • Strict Lockdown For 10 Days From May 12 In Nashik, Even Essential Items Will Be Available Only At Home; Even Petrol diesel Is Only For Essential Service Providers

कडक लॉकडाउन:नाशिकमध्ये 12 मे पासून 10 दिवसांचा कडक लॉकडाउन, अत्यावश्यक वस्तू सुद्धा केवळ घरपोच मिळतील; पेट्रोल-डीझेलही फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच

नाशिकएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 मे रोजी 12 वाजल्यापासून 22 मे पर्यंत 10 दिवस जिल्ह्यातील मार्केट पूर्णपणे बंद पाडले जाणार आहे. या लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.

 • जिल्ह्यात बुधवारपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत दूध विक्री सुरू राहील. याच कालावधीमध्ये भाजीपाला देखील विकता येईल. मात्र रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्यांना परवानगी राहणार नाही. ज्यांची दुकाने आहेत ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतील. हातगाडीवर फिरून भाजीपाला विक्री करणाऱ्यांना सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंतच विक्री करता येणार आहे.
 • या व्यतिरिक्त जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये सर्व बांधकामे बंद राहतील. जेथे कामगारांना राहण्याची सोय आहे अशाच ठिकाणी बांधकामांना परवानगी असेल. 10 दिवसांच्या कडक लॉकडाउनमध्ये मजुरांची ने-आण करता येणार नाही.
 • लॉकडाउन काळात सर्व बाजार समित्या बंद राहतील. पेट्रोल पंपांवर सुद्धा केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांनाच पेट्रोल दिले जाणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना तसे गणवेश, ओळखपत्र गळ्यात ठेवावे लागणार आहे.
 • वैद्यकीय सेवेशी संबंधित सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. लॅब, रुग्णालये आणि मेडिकलवरील कामगारांना ओळखपत्र बाळगावे लागणार आहेत.
 • या व्यतिरिक्त अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी सुरू राहील. विशेष म्हणजे, किराणा दुकाने सुद्धा केवळ होम डिलिव्हरी करू शकतील. लोकांना भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी सुद्धा बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी सकाळी 7 ते 12 अशी वेळ दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...