आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक पोलिस बंदोबस्त:नाशिकरोडला कडक पोलिस बंदोबस्त; मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान मंदिरात आरती

नाशिकरोड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ मेपासून अजान सुरू असलेल्या मशिदीसमाेर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिल्याने नाशिकरोड भागात तणापूर्ण शांतता होती. पोलिसांनी पहाटे चार वाजेपासूनच मंदिर आणि मशिदीसमोर कडक बंदोबस्त लावला होता. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. सकाळी रोकडोबा हनुमान मंदिरात मनसेचे विभाग अध्यक्ष विक्रम कदम, महाराष्ट्र राज्य उपचिटणीस बंटी कोरडे, संतोष सहाणे, किशोर जाचक, रोहन देशपांडे, प्रमोद साखरे, बाजीराव मते, विनायक पगारे या पदाधिकाऱ्यांनी आरती केली. तर मशिदीमधील नमाज पठणाच्या वेळीही आवाज कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांची दोन दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांवर नजर होती. मनसेच्या वतीने मुस्लिम बांधवांना राज ठाकरे यांचे आवाहन पूर्ण करावे, अशी विनंती करण्यात आली होती. एकूणच नाशिकरोड विभागात पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.

बातम्या आणखी आहेत...