आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी प्रयत्नशील; पालकमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नााशिकच्या औद्याेगिक विकासाला बळकटी देण्यासाठी, शहराचा राेजगार वाढावा याकरीता येथे इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व्हावे या निमाच्या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

19 ते 22 मे दरम्यान निमा आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (महाराष्ट्र शासन) यांच्या सहकार्याने आयोजित "निमा पॉवर 2023" या औद्योगिक प्रदर्शनाला उपस्थित रहाण्याचे आमंत्रण स्विकारल्यानंतर भुसे उद्याेजकांशी चर्चा करत हाेते.

सातपूर येथील आयटीआय मैदानावर हे प्रदर्शन हाेत असून महिन्याभरात जवळपास 80 टक्क्यांपेक्षा अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, चेन्नई, बंगलोर,अहमदाबाद,दिल्लीसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून लहान मोठ्या उद्योगासह विविध स्टार्टअपने सहभाग नोंदविला आहे. हे प्रदर्शन म्हणजे विद्युत क्षेत्राचा कुंभमेळा ठरेल,असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सचिव राजेंद्र आहिरे व प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी व्यक्त केला.

निमा पॉवर प्रदर्शन यावेळी दशकपूर्ती वर्ष साजरे करीत असून केंद्रीय विद्युत संशोधन संस्था सीपीआरआयच्या नाशिक शाखेच्या गुंतवणुकीच्या यशानंतर इलेक्ट्रॉनिक्स तथा इलेक्ट्रिकल क्लस्टर नाशिकला मंजुरीसाठी निमा व एमआयडीसीचे सामूहिक प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सदर प्रदर्शनाला आगळे महत्व प्राप्त झाले आहे.

विद्युत क्षेत्रातील मोठे प्रकल्प नाशकात येण्याच्यादृष्टीने निमा पॉवर प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल,अशी भावना सर्व प्रयोजकांनी व्यक्त केली आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, नितीन वागस्कर, शशांक मणेरीकर, प्रवीण वाबळे, किरण वाजे, दिलीप वाघांसह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

मुख्यमंत्री उद्घाटनास येणार

उद्योग मंत्री ना.उदय सावंत व पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करीत उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा या कार्यक्रमासाठी आणण्याचे आश्वासन दिले आहे.