आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:मविप्रच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्रच्या केटीएचएम काॅलेजच्या मुलांच्या वसतिगृहात वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात शिकत असलेल्या गौरव रमेश बोरसे (२१ रा. डांगसौंदाणे, ता. सटाणा) याने आत्महत्या केल्याचे मंगळवारी (दि. २२) निदर्शनास आले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केटीएचएमच्या वसतिगृहात रहात असलेल्या गौरव बोरसेकडे शेजारील खोलीतील विद्यार्थी इस्त्री घेण्यासाठी आले.

खाेलीतून प्रतिसाद न दिल्याने वाॅर्डनला माहिती दिली. त्यानंतर दरवाजा उघडला असता गौरवने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सरकारवाडा पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. प्रथमदर्शनी त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा कयास पालिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या माेबाइलमधूनच अधिक माहिती मिळू शकते, अशी पाेलिसांना आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...