आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना झाल्याने विद्यार्थ्याचा 'एलएलबी' चा प्रवेश रद्द:विद्यापीठाने फी देण्यास दिला नकार; वडिलांची ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलएलबी प्रवेश घेतल्यानंतर कोरोना झाल्याने घेतलेला प्रवेश रद्द करण्याची मागणी केली. विद्यापीठ प्रशासनाने फी परत देता येणार नाही म्हणून सांगीतले. याविरोधात विद्यार्थ्याच्या वडिलांनी ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार केली होती. न्यामंचाने तक्रारदार आणि विद्यापीठ प्रशासनाचे म्हणने एकून घेत विद्यार्थ्याने जमा केलेल्या 60 हजार फी पैकी 52 हजार 500 रुपये विद्यार्थ्याला परत करण्याचे आदेश दिले.

ग्राहर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, तक्रारदार देवेंद्र गजभीये रा. इंदिरानगर यांनी न्यायमंचात तक्रार दिली होती. 29 ऑक्टोंबर 2019 एलएलबी कोर्स करण्यासाठी पुण्यातील एका विद्यापीठात तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश घेतला होता. प्रवेश घेतांना 60 हजार रुपये फि जमा केली होती. कोविड मुळे मुलाने विद्यापीठात ऑनलाईन कोर्स सुरू केला होता. मात्र मुलास गंभीर स्वास्थामुळे पुणे येथे जाऊन कोर्स करणे शक्य नसल्याने शहरात राहून करण्याचे ठरवले होते. यामुळे विद्यापीठात घेतलेला प्रवेश रद्द करण्याची मागणी केली होती. विद्यापीठाने फी परत देण्यास नकार दिला होता. याविरोधात गजभीये यांनी ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार विद्यापीठाच्या विरोधात तक्रार केली होती.

न्यायमंचात विद्यापीठाच्या वतीने केलेल्या युक्तीवाद मध्ये एकदा घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नाही प्रवेश शंबर दिवसानंतर रद्द केला आहे. यामुळे फी परत देण्याची तरतुद नाही असे सांगीतले. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलींद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे, सचीन शिंपी यांनी तक्रार आणि विद्यापीठाचे प्रतिनिधी यांचे म्हणने एकून घेत विद्यापीठाने विद्यार्थ्याला फी परत न देऊन सेवेत कमतरता केली आहे.

तक्रारदाराने दिलेली 60 हजार फी परत देण्याची मागणी केलेली आहे. तक्ररारदार यांच्या मुलाने विद्यापीठात दिड महिना ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. या कालावधीत शिक्षण घेतलेली फी 7 हजार 500 वजा करुन 52 हजार 500 रुपये परत मिळण्यास पात्र आहे. तक्रारदाराने केलेल्या अर्जाच्या दिनांकपासून अर्जाचा खर्च 2 हजार शारिरीक मानसिक त्रासापोटी 5 हजार द्यावे असे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...