आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची २०२२ व २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दहा प्रमाणपत्रांची गरज असणार असून विद्यार्थी व पालकांनी आतापासूनच प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे जमा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नाॅलाॅजी पदविका अभ्यासक्रम तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी या शिक्षणक्रमांचे प्रवेश हे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून होत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची दहा प्रमाणपत्रे आवश्यक असतात. ही प्रमाणपत्रे जमा करून ठेवण्याचे आवाहन तंत्रशिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, ऐनवेळी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ होऊ नये, यासाठी तंत्रविभागाने हे आवाहन केले आहे. ऐन वेळी प्रमाणपत्रे उपलब्ध नसतील तर विद्यार्थ्यांना पळापळ करावी लागते.
प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक
जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नाॅन क्रिमी लेअर, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, दिव्यांगांबाबतचे प्रमाणपत्र, सैन्य दलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याकांसाठी प्रवर्गाचे प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते या सर्व प्रमाणपत्रे प्रवेशासाठी अनिवार्य आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.