आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थी बनतात शिस्तप्रिय‎;मविप्र संचालक अॅड. लक्ष्मणराव लांडगेंचे प्रतिपादन

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांचे ‎जीवन शिस्तप्रिय बनते. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात विविध‎ कौशल्य विकसित होते. त्यामुळे ‎श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी ‎ ‎स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे ‎आवाहन मविप्रचे संचालक अॅड. ‎लक्ष्मणराव लांडगे यांनी केले.‎ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‎ आणि मराठा विद्या प्रसारक‎ समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय सातपूर यांच्या संयुक्त‎ विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना‎ अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर‎ बेलगावढगा येथे आयोजित‎ करण्यात आले आहे. शिबिराचे‎ उद्घाटन अॅड. लांडगे यांच्या हस्ते‎ करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी‎ प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक‎ शशिकांत जाधव उपस्थित होते.‎ त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.‎ ग्रामपंचायत सदस्य दत्तू ढगे यांनी‎ गावची सर्व स्तरावरची सखोल‎ माहिती देऊन इतिहास कथन केला.‎ याप्रसंगी मविप्र संस्थेच्या‎ संचालिका शालिनी यांनी‎ विद्यार्थ्यांना श्रमाबरोबर शिस्तीचे‎ महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या.‎

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. डी. जी. उशीर यांनी‎ राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार‎ शिबिराचे महत्त्व सांगितले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.‎ सुरेखा गायकवाड व आभार राष्ट्रीय‎ सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी‎ प्रा. मच्छिंद्र शेंडगे यांनी केले.‎ कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व‎ प्राध्यापक व प्राध्यापकेतर‎ कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम केले.‎

बातम्या आणखी आहेत...