आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 काेटी अनुदान थकीत:समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून निर्वाह भत्याची प्रतीक्षा

नाशिक / किशाेर वाघ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी गत ८ महिन्यांपासून निर्वाह भत्त्यापासून वंचित आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक कामासाठी (स्टेशनरी, परीक्षा शुल्क, विविध शुल्क) आवश्यक असणाऱ्या बाबींनाही खरेदी करण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील १५ वसतिगृहांसाठी मिळून तब्बल ९९ लाख ५५ हजारांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. समाजकल्याण विभागाकडून शासनाकडे त्यासाठी प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही ते प्राप्त झाले नसल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक अडचणीत आले असून घरचीही परिस्थिती बेताचीच असल्याने आता या विद्यार्थ्यांना मध्यावर शिक्षण सोडण्याची वेळ ओढावली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शहरातील संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. स्टेशनरी, परीक्षा शुल्क अन् इतर बाबींसाठी निर्वाह भत्ता दिला जातो. पण यंदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मे-जून तसेच काहींना आॅगस्टनंतरचा निर्वाह भत्ता प्राप्त झाला नाही. या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना निर्वाह भत्ताच मिळत नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे.

महाविद्यालयासाठी पासचीही समस्या विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी बस पास, परीक्षा शुल्कासह महाविद्यालयात आकारण्यात येणारे विविध शुल्क भरण्याचीही अडचण झाली आहे. वह्या-पुस्तके अन् पेन-पेन्सिलसह इतर स्टेशनरीही खरेदी करता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

बातम्या आणखी आहेत...