आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:विद्यार्थ्यांनी जाणले‎ अन्नाचे महत्त्व‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्नाची नासाडी टाळणे,‎ सकस आहार घेणे आणि शाश्वत‎ जीवनशैली अंगीकारल्यास भूकमुक्त‎ विश्वाची संकल्पना साकारू शकते,‎ हा संदेश देण्यासाठी शहरातील दिल्ली‎ पब्लिक स्कूलमध्ये विशेष उपक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ या उपक्रमात सहभागी झालेल्या‎ विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय‎ रुग्णालयातील गरजू व्यक्तींपर्यंत‎ नेण्यात आले.

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी‎ स्वतःच्या हाताने अन्नदान केले.‎ आजही अनेक व्यक्ती अर्धपोटी‎ राहतात, तसेच अन्न किती महत्त्वाचे‎ असते. हे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे‎ जाणले. संस्थेचे संचालक सिद्धार्थ‎ राजघरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व‎ प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त यांच्या‎ संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम‎ राबविण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...