आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:फुले विद्यापीठात राहूनच आता विद्यार्थ्यांना अमेरिकेत संशाेधन संधी; 5 सामंजस्य करार

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेत अमेरिकेतील नामांकित १३ विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांसोबत पाच सामंजस्य करार केले आहेत. यामुळे विद्यापिठात राहूनच फुले विद्यापीठाचे विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये संशोधन करू शकतील. तर अमेरिकेन विद्यार्थ्यांनाही योगा, भारतीय संगीत, कला व इतरही आवडीच्या अभ्यासक्रमाचे फुले विद्यापीठात शिक्षणाची दारे खुली झाली असून, दोन्ही देशांतील शिक्षकांनाही याद्वारे जाॅईंट रिचर्ससह अध्यापनाची संधी उपलब्ध झाली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या नव्या संधीसाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या शिष्टमंडळाने ४ ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’येथे भेट दिली. डॉ. कारभारी काळे व रूसा समन्वयक तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा या शिष्टमंडळात सहभाग होता. शिष्टमंडळाने अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

पुणे विद्यापीठाने अमेरिकेतील या विद्यापीठांसह शैक्षणिक संस्थांशी केलेले करार असे...

न्यूयॉर्कला भारतीय केंद्र
या विद्यापीठात भारतीय केंद्राची स्थापना करण्याचा करार झाला. असा करार करणारे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ देशातील पाहिले विद्यापीठ ठरले.

स्टुडंट्स सिटी न्यूयॉर्क
या कराराच्या माध्यमातून ब्राॅनक्स कम्युनिटी कॉलेज, बॅरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क रिमोट सेन्सिंग अर्थ सिस्टिम या संलग्न संस्थांसोबतही संबंध प्रस्थापित झाले.

ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी
या करारामुळे जैव विज्ञानशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सक्षम करण्यात येईल. यात प्रभावी संशोधनाच्या अभ्यासक्रम असून, संशोधन करणाऱ्यांना माेठी संधी उपलब्ध हाेणार आहे.

कॅलिफाेर्निया युनिव्हर्सिटी
या सामंजस्य करारात उद्योजकता विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रमांवर अधिक लक्ष दिले जाईल. त्यामुळे भारतात राेजगार वाढेल.

युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयाॅर्क
स्टुडंट्स सपोर्टिंग इस्रायल, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क हा करार राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. करारामुळे या दाेन देशांशी भारताचे संबंध मजबूत हाेतील.

परदेशी विद्यार्थी भारतीय कलेशी एकरूप हाेणार
करारामुळे कार्यशाळा, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम, परिषद, संशोधन प्रकल्प अशा अनेक गोष्टी करता येतील. या करारांमुळे अनेक विद्यार्थी व प्राध्यापक आदान-प्रदान हाेतील. अनेक परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय कला, संगीत शिकता येईल.- डॉ.कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.