आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वराजित संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली गुरुवंदना ; गाने सुहाने मैफलीत गुरुंप्रति कृतज्ञता

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या प्रख्यात गायिका रागिणी कामतीकर संचलित स्वराजित संगीत अकॅडमीतर्फे ‘गाने सुहाने’ ही सदाबहार गाण्यांची मैफल झाली. स्वराजितमध्ये संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या गुरुंप्रति कृतार्थ भावना व्यक्त करत ही अनोखी गुरुवंदना दिली. संगीत म्हणजे तुम्हा-आम्हा रसिकांच्या हृदयातील स्पंदने असून ज्याला साक्षात परमेश्वराने तयार केलेले आहे, असे सांगणाऱ्या गुरू रागिणीताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थिनींनी एकाहून एक अशी सदाबहार गाणी सादर केली. ‘आजा पिया’ या गाण्यापासून मैफलीची सुरुवात झाली आणि ‘इत्तीसी हसी…इत्तासा तुकडा चांद का’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

नव्या जुन्या गाण्यांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला. प्राजक्ता बागड, स्वाती पाचपांडे, श्रुती वैशंपायन, सुनीता शिरोडे, सोनाली चौधरी, डॉ. अर्चना वरे, डॉ. आरती चिरमाडे, डॉ. पूनम वराडे, श्रीशा जुनागडे, गायत्री भांडारी, लक्ष्मी अपशंकर, डॉ. सुप्रिया जोशी यांनी आपली गाणी सादर केली.

अमर भोळे यांनी सूत्रसंचलन केले. सचिन तिडके यांनी ध्वनिव्यवस्था पाहिली. रागिणीताईंसाठी गोदामाईची पत्रवारी साक्षात पोस्टमन बनून दत्तात्रय कोठावदे यांनी सभागृहात सादर केली व प्रेरणादायी पत्रवाचन केले.

बातम्या आणखी आहेत...