आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी डी.एड आणि बी.एडची परीक्षा व केंद्र सराकारमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्या आहेत. विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली असून, वेळपत्रकात बदल न झाल्यास विद्यार्थ्यांना यापैकी एका परीक्षेला मुकावे लागणार असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना परीक्षांच्या वेळापत्रकात आता बदलाची अपेक्षा व्यक्त केली आहे. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पदवीका( डी.एड) आणि पदवी (बी.एड) या दोन्ही अभ्यासक् रमांच्या परीक्षांच्या तारखा शिक्षण विभागाच्या वतीने तीन वेळा बदलल्या होत्या. प्रत्येकी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.
अन् आता १० जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार असल्याचेी जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून अभ्यासही सुरु झाला. दरम्यान आता मोठी अचडण निर्माण झाली आहे. डी.एड (प्राथमिक शिक्षकांसाठी) आणि बी.एड (माध्यमिक शिक्षकांसाठी) या दोन्ही पदविका आणि पदवी प्राप्त उमेदवारांना थेट शिक्षक म्हणून रुजु केले जात नाही. तर त्यासाठी शासनाने ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ उत्तीर्णतेची अट घातली आहे. हीच परीक्षा आता १३ आणि १७ जानेवारीला होणार आहे. म्हणजे दोन्ही परीक्षांची वेळ एकच झाली आहे. शिवाय परीक्षा केंद्र हे एकमेकांपासून दूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हींपैकी एकच परीक्षा देता येईल. एका परीक्षेला मुकावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमासोबतच नाराजीही वाढली आहे.
राज्य शासनाने या मुद्द्याकडे लक्ष देऊन डीएड आणि बीएड या परीक्षांची तारीख पुढे ढकलावी. असेही यापूर्वी ती ३ वेळा बदलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. शिवाय कुठल्याही दडपण किंवा नाराजीशिवाय विद्यार्थी दोन्ही परीक्षा देऊ शकतील. - रमीज पठाण, शहर उपाध्यक्ष रा.वि.काँ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.