आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध सांस्कृतिक ​​​​​​​ कार्यक्रमांचे आयोजन:दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली; सांस्कृतिक कार्यक्रमही

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, दिव्यांगांच्या विशेष शाळा तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. नाशिक शहरातील १८ दिव्यांग शाळा व पुनर्वसन केंद्र यांमधील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग घेतला.

या रॅलीचा समारोप मोदकेश्वर मंदिर येथे करण्यात आला. जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व सामाजिक संस्थांच्या वतीने माेदकेश्वर मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे उपस्थित होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. माई लेले शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली.

सिद्धिविनायक मतिमंद शाळेतील विद्यार्थी आदित्य शिंदे याने दिव्यांग मनोगत व्यक्त केले. पॅरा ऑलिम्पिक २०२२ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पदक प्राप्त क्रीडापटू सिद्धी भांडारकर, स्वयम पाटील, गौरी गर्जे यांचादेखील गौरव करण्यात आला.रोटरीच्या वतीने ब्लाइंड स्टीक्सचे वाटप : रोटरी क्लब नाशिकच्या वतीने शासकीय अंधशाळेतील १० विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक सेन्सर असलेल्या दोन लाख रुपये किमतीच्या ब्लाइंड स्टीक्सचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

दिव्यांग विद्यार्थ्यांना चष्मे
पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग अल्पदृष्टी असलेल्या १० विद्यार्थ्यांना रत्नानिधी ट्रस्टच्या वतीने स्वरूपात चष्म्याचे वाटप करण्यात आले.

या शाळांचा सहभाग
श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय, पडसाद कर्णबधिर विद्यालय, जागृती कर्णबधिर विद्यालय, विकास मंदिर मूकबधिर विद्यालय, प्रबोधिनी विद्यामंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा, सुनंदा केले विद्यामंदिर, विकास मंदिर मतिमंद विद्यालय व कार्यशाळा, रुसी इराणी शाळा, मनाली मतिमंद विद्यालय, शासकीय अंधशाळा, नॅब कार्यशाळा, नाशिक नॅब भावना चांडक ब्लाइंड स्कूल, नॅब चंद्र‌भागाबाई बहुविकलांग शाळा, व्ही. एक्सेल स्कूल, सिद्धिविनायक मतिमंद शाळा, राष्ट्रीय दृष्टिहिन शाळा.

बातम्या आणखी आहेत...