आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती पुण्यतिथी साजरी:विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठेंना नमन

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित मा. रा. सारडा विद्यामंदिर शाळेत शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर, मुख्याध्यापिका प्रियंका निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

सहावी ‘ई’च्या वर्गाने भाषणे, नाटक, पोवाडा असे विविधरंगी कार्यक्रम सादर केले. त्यांना वर्गशिक्षका संजीवनी निकम यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष राजेंद्र कापसे यांनी अण्णा भाऊ साठे तर लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. प्रमुख अतिथी मनीषा पाटील, प्रमुख वक्त्या पुष्पा मोरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली.शिक्षक प्रतिनिधी व सहकार्यवाह मनीषा देशपांडे, ज्येष्ठ शिक्षिका स्नेहल आपटे, अतुल करंजे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...