आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Students' School Cycle Made Easier By Bicycles; Distribution Of Bicycles To 25 Female Students By Gunj Foundation And Gramodaya Sanstha| Marathi News

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांचे शाळेचे चाक सायकलमुळे सुकर; गुंज फाउंडेशन अणि ग्रामोदय संस्थेतर्फे २५ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी भागातील अतिदुर्गम ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक मैल पायपीट करत शाळेत ये-जा करावी लागते. या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रोज संघर्ष करावा लागतो. शाळेच्या प्रवासातील हा संघर्ष कमी व्हावा तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे, यासाठी नाशिकच्या गुंज फाउंडेशन अणि ग्रामोदय शिक्षण संस्था यांच्यावतीने कुर्नोली येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील २५ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण पाहावयास मिळाले. सायकलींच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. गुंज फाउंडेशन नाशिक व ग्रामोदय शिक्षण संस्था यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामोदय संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे, गुंज फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश बोरा, शुभदा बोरा, तरुण गुप्ता, दीपाली गुप्ता, स्नेहा सराफ, वनिता बंका, शेफाली अग्रवाल, अमित साबू, आलोक झा, अजित गुप्ता, संजय अग्रवाल, राजेंद्र मोरे, डॉ. सचिन हिरे, मुख्याध्यापक एस. एस. जाधव आदी उपस्थित होते. बी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

गरजू विद्यार्थ्यांची निवड
कुर्नोली विद्यालयात येणारे बहुसंख्य विद्यार्थी हे अतिदुर्गम अशा भागातून येतात. त्यांना तीन ते चार किलोमीटर पायी शाळेत ये-जा करावी लागते. उन्हाळा असो की पावसाळा..अशा सर्वच दिवसांमध्ये मोठा संघर्ष करत प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी २५ गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या अवारात वृक्षारोपणही करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...