आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या आश्रमशाळेत 15 जूनला प्रवेशोत्सव:विद्यार्थांचे शाळेत होणार जंगी स्वागत; शिक्षकांकडून जोरदार तयारी सुरू

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी शैक्षणिक वर्षापासून नियमितप्रमाणे 13 जूनपासून वर्ग उघडणार असले तरीही आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थी मात्र 15 जूनपासून शाळेत हजर होतील. विदर्भात 27 जूनला विद्यार्थी हजर होणार आहेत. हे दोन्ही दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरे केले जाणार असून, तत्पूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत जाऊन प्रवेशोत्सवाची पूर्व करणार आहेत, असे आदिवासी शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्याबाबत जनजागृती

दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात कधी चालू कधी बंद राहाणाऱ्या शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नियमितपणे सुरू होतील, असे आंनददायी चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे. त्यामुळेच राज्याचा शालेय शिक्षण विभाग असेल, समाज कल्याण विभाग अन् आदिवासी विभाग असेल सर्वांनीच वेगाने तयारी सुरू केली आहे.

फुलांची सजावट अन् रंगरंगोटी

आदिवासी विभागाने तर पहिले दोन दिवस शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत दाखल होऊन वर्गखोल्यांची, परिसराची साफ-सफाई करतील. अन् विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, उत्साह वाटेल अशा स्वरुपातील फुलांची सजावट, रंगरंगोटी, रांगोळी, असे अत्यंत चैतन्यमय वातावरण निर्मिती करण्याची तयारी करतील. कुठे ढोल ताशांचा गजराचीही तयारी केली जाईल, असेही आदिवासी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक बाबींची माहिती देत विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागृत केले जाईल.

दोन टप्प्यांत शाळा सुरू

महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाच्या शाळा या दोन टप्प्यात सुरू होणार आहे. त्यात विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रातील आश्रमशाळेत 15 जूनपासून विद्यार्थी हजर होतील. तर विदर्भातील उष्णतेचे प्रमाण पाहाता 27 पासून विद्यार्थ्यी शाळेत हजर होतील. तत्पूर्वी 24 आणि 25 जूनला शिक्षक शाळांची स्वच्छता करतील.

बातम्या आणखी आहेत...