आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृ्त्ती:30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या दिव्यांग सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या शालांतपूर्व, शालांत परिक्षोत्तर व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून शालांत पूर्व, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. शाळा व महाविद्यालयांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.scholorship.gov.in या संकतेस्थळावर सादर करावयाचे आहेत.

30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार असून सदोष अर्ज पडताळणीची व संस्था पडताळणीची मुदत 16 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आहे. शांलांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असून सदोष अर्ज पडताळणीची व संस्था पडताळणीची मुदत 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्तीज दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले

बातम्या आणखी आहेत...