आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षणाचा श्रीगणेशा:अभ्यास, वाचन आणि कला; ‘मानवधन डिजिटल स्कूल’ अॅपची उपयुक्त सेवा, अभ्यासासह जगभराची माहिती

नाशिक (गणेश डेमसे )3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

डिजिटल शाळांबद्दल अनेकदा बोलले गेले, मात्र ते प्रत्यक्षात आणण्याची संधी कोरोना साथीतील ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना मिळाली. या पैकी एक उपयुक्त प्रयोग म्हणजे नाशिकच्या मानवधन शाळेने तयार केलेले विद्यार्थ्यांसाठीचे मोफत अॅप. मानवधन डिजिटल स्कूल या नावाने हे अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध असून त्यावर अभ्यासासह वाचन, आरोग्य, मनोरंजन, माहिती आणि जगभरातील घडामोडी मुले एका क्लिकवर जाणून घेताहेत.

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने मानवधन संस्थेने हे अॅप तयार केले आहे. यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचा इयत्तानुसार अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांनी नाव नोंदवल्यानंतर वर्ग खोलीत ज्या प्रमाणे शिक्षण अध्यापन करतात, त्याच पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या अॅपच्या मदतीने विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ लागले आहे.

या डिजिटल स्कूल अॅपवर शालेय शिक्षणाबरोबरच सर्वांगीण ज्ञान व माहिती मिळविण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात रोजची वर्तमानपत्रे, दिनविशेष, अभ्यास केंद्र, अाॅनलाइन परीक्षा, ग्रंथालय, विज्ञान केंद्र, हेल्थ काॅर्नर, टीव्ही आणि रेडिओ, नोकरी व करिअर, शेती, हवामान, शासकीय योजना व जीअार, पर्यावरण अाणि जग या विविध माध्यमातून जगभरातील माहिती विद्यार्थी एका क्लिकवर मिळवू शकतात. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षांची तसेच विविध परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे अॅप फायदेशीर ठरू लागले अाहे.

ऑनलाइन ज्ञान आणि ऑनलाइन परीक्षा

 • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध
 • शाळेतील विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी मोफत
 • पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यास
 • कला आणि सामान्य ज्ञानही ऑनलाइन
 • ऑनलाइन परीक्षांचीही सुविधा
 • हेल्थकॉर्नरमध्ये आरोग्याच्या टिप्स
 • वाचनाच्या आवडीसाठी ग्रंथालय
 • मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांच्या पीडीएफ
 • मासिके, कथापुस्तके
 • शैक्षणिक टीव्ही आणि रेडिओचीही सोय
 • जगभरातील घडामोडींची माहिती
 • स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त

सर्व माहिती एकाच ठिकाणी
विद्यार्थ्यांना घरी राहूनच कशा पद्धतीने शिक्षण घेता येईल, याचा विचार करताना डिजिटल स्कूल अॅप निर्माण करण्याची संकल्पना सुचली. दोन महिने त्यावर काम केल्याने अाता प्रत्यक्षात गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांसह ते सर्वांसाठी मोफत अाहे. शिक्षण अाणि सामान्यज्ञान एकाच ठिकाणी मिळू शकेल, असा प्रयत्न आम्ही केला आहे. - प्रकाश काेल्हे, संस्थापक, मानवधन संस्था
शिक्षणाचा श्रीगणेशा