आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Subsidy Of Pradhan Mantri Awas Yojana Should Be Paid Immediately; Order To Finance Company, Judgment Of Consumer Justice Forum| Marathi News

आदेश:पंतप्रधान आवास योजनेची सबसिडी तत्काळ द्यावी; फायनान्स कंपनीला आदेश, ग्राहक न्याय मंचचा निकाल

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहाउस विकत घेण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देण्यात येणारी शासकीय सबसिडी नाकारणाऱ्या जे. एम. फायनान्स होम लोन लि. या बाेरिवली (मुंबई) येथील कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला असून ग्राहकाला सबसिडीचे दाेन लाख ६७ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.प्रशांत माळवे (रा. शिंदे) यांनी यांनी याबाबत तक्रार दाखल केली हाेती. शिंदे गावाच्या शिवारात श्री दत्त दिगंबर रोहाउस याेजनेत रोहाउस विकत घेण्यासाठी जे. एम. फायनान्शियल कंपनीकडे गृहकर्ज प्रकरण दाखल केले होते.

कंपनीने दाेन लाख ६५ हजारांची शासकीय सबसिडी एक वर्षाच्या आत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, संबंधित फायनान्स कंपनीने कर्ज प्रकरण शहरी भागात येत नसल्याचे कारण सांगत सबसिडी मंजूर होणार नाही असे कळवले. कर्जदार माळवे यांनी कंपनीच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधला असता अर्बन एरियासाठी सबसिडी बंद ‌झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत माळवे यांनी ग्राहक न्याय मंचामध्ये तक्रार दाखल केली होती. संबंधित वित्त कंपनीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीसाठी पाठपुरावा केला नाही. याचा विचार करता संबंधित कंपनीने ग्राहकाला सबसिडी रक्कम अर्ज केलेल्या तारखेपासून प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत १० टक्के व्याजासह देण्याचे व त्रासापोटी १० हजार रक्कम देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी, प्रेरणा काळुंखे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...