आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ध्येय निश्चित करून तपश्चर्या केल्यावर यश हमखास

देवळाली कॅम्प5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम अन‌् तपश्चर्या करावी लागते. असे ध्येय निश्चित करून तपश्चर्या केल्यावर कोणत्याही व्यक्तीला यश हमखास मिळते, असे प्रतिपादन लेफ्टनंट सूरज चौधरी यांनी केले.देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी (दि. १२) महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सूरज चौधरी यांची लेप्टनंटपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार आणि मुलाखतीचे आयोजन केले होते.

त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे, सरचिटणीस गजीराम मुठाळ, प्रशांत दिवंधे, उपप्राचार्य डॉ. सोपान एरंडे, उपप्राचार्य दिलीप जाधव, एन. के. सोनवणे आदी होते.

लेफ्टनंट चौधरी म्हणाले की, भारतीय लष्कर व्यवस्थेत अनेक पदांची सेवासंधी उपलब्ध आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीपासूनच प्रयत्न करावेत. प्राचार्य डॉ. काळे यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट चौधरी यांची उपप्राचार्य डॉ. एरंडे यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात सूरजच्या जडणघडणीवर प्रकाशझोत टाकला. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना लेप्टनंट चौधरी यांना अनेक विद्यार्थ्यांनी लष्करी पदभरती, पूर्वतयारी, मुलाखत यांसारख्या विषयांवर प्रश्न केले. त्याला यांनी सविस्तर उत्तरे दिली. डॉ. पुरुषोत्तम गांगुर्डे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...