आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच ध्येय निश्चित करून वाटचाल करावी. जे क्षेत्र निवडणार असाल त्यात मन लावून कार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केले. सातपूर येथे मनपाच्या जिजामाता शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय गणवेश व पुस्तकांचे वाटप केले. याप्रसंगी त्यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते माजी नगरसेवक सलीम शेख, माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, सामाजिक कार्यकर्ते रामहरी संभेराव उपस्थित होते. पालकांचीदेखील विद्यार्थ्यांप्रति जबाबदारी वाढत असून शाळेवरील अध्ययनासोबतच विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणे गरजेचे असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले. सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी अन् शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी तर प्रास्ताविक योगेश सूर्यवंशी केले. सचिन चिखले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सोनजी गवळी, वैभव आहिरे, यशवंतराव जाधव, रेगजी वसावे, भारती पवार, सोनिया बोरसे, सोनाली कुवर, पुनाजी मुठे, सुरेश चौरे, मंदाकिनी कटारे, दत्तात्रय शिंपी, पल्लवी शेवाळे, कविता शिरोडे, शांताराम देवरे, पुष्पा नवले, भास्कर जाधव, शारदा सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते.
र. ज. बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचे औक्षण
नाशिकरोड येथील श्रीमती र. ज. चौहान बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. मुख्याध्यापिका संजीवनी धामणे, दीपक जाधव, रेवती कऱ्हू, प्रद्युम्न जोशी, कैलास आरोटे, निवृत्ती सोनवणे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. स्वाती टिळे यांनी सहाय्य केले. तसेच वर्षारंभ उपासनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी रोहिणी कुलकर्णी, डॉ. प्राची सराफ, मृणाली धारणे, सोनम सोनवणे आदी उपस्थित होते.
वनिता विकास मंडळाच्या प्रशालेत पुस्तकांचे वाटप
नाशिकरोड येथील वनिता विकास मंडळ प्रशालेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी संस्थेच्या सहकार्यवाह कविता देशपांडे होत्या. वर्गखोल्या पानाफुलांनी, रंगीबेरंगी झेंडे, पताका आणि फुग्यांनी सजविण्यात आले होते. ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. विद्यार्थी आनंदाने उड्या मारत शाळेत येत होते. शिक्षिका जयश्री जाधव, नेहा राजहंस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरिता पाचपांडे यांनी भजन सादर केले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल नागरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा पाचपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज अवचिते, स्वागतगीत नीता शहाणे तर आभार सरिता पाचपांडे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.