आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:ग्रीन व क्लीन कॉलेज स्पर्धेमध्ये गुरू‎ गोबिंद सिंग तंत्रनिकेतनचे यश‎

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किर्लोस्कर वसुंधरातर्फे पुणे येथे‎ आयोजित ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ या‎ स्पर्धेमध्ये गुरूगाेबिंद सिंग तंत्रनिकेतनच्या‎ विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. कॉलेजमधील‎ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, शाश्वत‎ विकासाच्या विचारसरणीला चालना देण्यासाठी ही‎ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील‎ विजेत्यांना युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचे‎ माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते शनिवारी‎ गौरविण्यात आले.

‘किर्लोस्कर चिलर्स’चे‎ व्यवस्थापकीय संचालक अविनाश मंजुळ आणि‎ ‘किर्लोस्कर वसुंधरा’चे आनंद चितळे, वीरेंद्र चित्राव‎ उपस्थित होते. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर‎ आणि कर्नाटकातील होस्पेट आणि कोप्पल या‎ शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेत शंभरहून अधिक कॉलेज‎ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत निवडलेल्यांना‎ शनिवारी पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेचे‎ अध्यक्ष बलबीरसिंग छाब्रा, उपाध्यक्ष हरजीतसिंग‎ आनंद, सचिव कुलजितसिंग बिर्दी तसेच‎ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीहरी उपासनी यांनी‎ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...