आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोवाडा गायन:पोवाडा गायन स्पर्धेत मराठा हायस्कूलचे यश

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन साने गुरुजी कथामाला या उपक्रमांतर्गत कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्यासह विविध राष्ट्रपुरुष, मराठी भाषा व संस्कृती या विषयांवर आधारित पोवाडा गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेत नाशिक येथील मराठा हायस्कूल विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

शिवरायांचा झुंजार मावळा वीर तानाजी यांचा पोवाडा या विद्यालयाने सादर केला. संगीत संयोजन संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांनी केले व तबल्याची साथ जय बोराडे यांनी दिली. ढोलकीवादन विराज दांडेकर यांनी केले. तेजस नेरे, ओंकार भोसले, गौरी क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संगीत वाद्यांची साथ दिली. स्पर्धेमध्ये ईश्वरी क्षीरसागर, साक्षी अनवडे यांनी सहभाग घेतला. त्यांना साथ शंतनू उगले, अमेय शेजवळ, वैष्णवी शिंदे, आत्मजा पांगारकर, पूर्वा सोनवणे, कृतिका कडवे, वसुधा पाटील, मानसी चौधरी यांनी दिली. या विद्यार्थ्यांना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष प्रताप सोनवणे, मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर, उपमुख्याध्यापक उत्तमराव बस्ते, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...