आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंचा धमाका:पिंच्याक सिल्याट राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचे यश, 150 खेळाडूंनी नोंदवला होता सहभाग

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशन व डॉ. पल्लवी जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 31 मेदरम्यान त्र्यंबकेश्वर येथील संत जनार्धन स्वामी आश्रमात राज्यस्तरी पिंच्याक सिल्याट स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी इंडियन पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले, शिल्पकार एज्येकशनचे संस्थापक अध्यक्ष सोपान शेडगे, प्रतिमा जाधव आदी उपस्थित होते.

स्पर्धेत विविध जिल्ह्यात 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशनच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, दोन रजत व 11 कांस्य पदक प्राप्त करीत, दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. 3 ते 6 वयोगटात नागार्जुन बनसोडे या खेळाडूने सुवर्ण पदक प्राप्त केले.

यावेळी किशोर येवले यांनी मेडल देवून त्याचा सन्मान केला. खेळाडूंना असोसिएशनचे सचिव नागेश बनसोडे, प्रशिक्षक अंशुल कांबळे, क्रीनाक्षी येवले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंना सचिन गवई, डॉ. विशाल जाधव, डॉ. किर्ती गवई, डॉ. उज्जवला निकम, राम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...