आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी:राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश; राज्यातून 300 विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गॅमा अबॅकस ञिशूर केरळ आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा रविवार (दि 05) शुभेच्छा लॉन्स दिंडोरी रोड म्हसरूळ येथे घेण्यात आली होती. 5 मिनिटांत 100 समीकरणे अबॅकस व बोटांच्या क्रियानी सोडविण्याच्या स्पर्धेत राज्यातून 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. राज्यातून विविध विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कलागुण सादर केले.

स्पर्धेत शर्वरी पाटील,दुर्वांग पाटील, उत्कर्षा पानसरे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे व अथर्व बडगुजर, ऋग्वेद मालपुरे यांना द्वितीय क्रमांकाचे तसेच प्राची कोतकर,अदिती ठाकरे, श्रेयश भिरूड, यांना तृतीय क्रमांकाचे व निंवाशी सोनजे, रिध्दी अमृतकर,आरूषी चिंचोरे ,सर्वज्ञ मेधने,मयंक धुम,प्रज्ञा भोये,विदुला खैरनार,अर्नव गवळी, ओम बागुल,आर्ष देशमुख,कनिष्का बोरसे,अद्विता भांगे,स्वरा शिरोडे, सुशांत वरखेडे,विराज वरखेडे, रेहांश वझरे, वृशांक टर्ले, श्लोक मोरे,भावी पगार, ऋग्वेद ढासे,रिध्देश पाटील,तिर्थराज मोरे,रूही बागुल सुरभी कोतकर,जान्वी मोरे,मेधावी काकड, कौस्तुभ कुंभारे,दिव्या पाखले इ. उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

अबॅकसच्या आठ लेव्हल यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अदिती ठाकरे, प्रज्ञा भोये, विदुला खैरनार, अथर्व कोठावदे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी गॅमा अबॅकसचे सीईओ डॉ.के.नागुलनाथन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन गॅमा अबॅकस व वैदिक गणित अकॅडमी, म्हसरूळ चे संचालक प्रा.गणेश कोतकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...