आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिकरोड भागातील विद्यार्थ्यांचेही घवघवीत यश ; अनेक शाळांचे निकाल 110 टक्के

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड, देवळाली, भगूर या परिसरातील शाळांमध्येही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागल्याने त्या शाळांमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. पंड्या नूतन माध्यमिक विद्यालय वंजारवाडी येथील अमित पंड्या नूतन माध्यमिक शाळेचा निकाल ९७ टक्के लागला असून शाळेत अक्षदा जुंद्रे ९२ टक्के प्रथम, शुभांगी शिंदे ९० टक्के द्वितीय तर तनुजा शिंदे ८८ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.नूतन माध्यमिक विद्यालय साकूर या शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. यात राधिका बोढारे (प्रथम) ८७ टक्के, सायली जाधव ८६ टक्के (द्वितीय) तर प्रियांका जाधव ८६ टक्के (तृतीय) गुण मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण मंडळ भगूरचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे यांनी अभिनंदन केले आहे. कॅन्टोन्मेंट स्कूलचा निकाल १०० टक्के येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून इंग्रजी माध्यमामध्ये प्रांजल गोडसे ९०.४० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय विद्या भोसले ८८.२० टक्के तर यश मोसंबे ८७.६ टक्के गुण मिळवून तृतीय आला. तर मराठी माध्यमात प्रणाली उन्हवणे ९०.०० गुण मिळवून प्रथम. द्वितीय - सुरभी घटे हिने ८९.८० टक्के गुण मिळवले तर तृतीय क्रमांक वैष्णवी कुटे (८९.९० टक्के) गुण मिळवून उतीर्ण झाली. सर्व विद्यार्थ्यांचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, नियुक्त सदस्या प्रीतम आढाव, कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर, लेखापाल विवेक बंड, अभियंता विलास पाटील, सर्व माजी नगरसेवक, मुख्याध्यापक रामचंद्र गवळी, राजेंद्र यशवंते, विष्णल वाघ, माधव कुटे, रंजना सावंत, सुनीता बेडसेंसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. डॉ. गुजर स्कूलचा निकाल १०० % येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या हिंदी मीडियमचा १००% व इंग्लिश मीडियमचा निकाल ९८.१८ टक्के लागला. हिंदी मीडियमध्ये नंदिनी प्रेम पवार ८६.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, सोनी हरेरामसिंग यादव ८४.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, अल्फिया अल्ताफ खान ८३.६०% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला तर इंग्लिश मीडियममध्ये आकांक्षा अशोक गोडसे ९०.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, पूजा कल्पेश लकारिया ८९.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर गौरव संभाजी देशमुख ८८.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्ष नवीन गुरनानी सचिव रतन चावला यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अभिनंदन करण्यात आले. व्हिजन अकॅडमी शाळेचा १०० टक्के निकाल जेलरोड येथील शिवरामनगर येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० लागला आहे. यामध्ये श्रावस्ती सुरवाडे ९३.६० टक्के मिळवून प्रथम तर खादिजा तन्वीर अत्तार हिने ९३.२० टक्के द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अंकिता कैलास मुदलियार, मुख्याध्यापिका सुनीता थॉमस यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...