आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षण व बालगृहाचा वर्धापन दिन सोहळ्यात संवाद:सातत्यपूर्ण मेहनतीतून यश ; नाईकनवरे

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी अविरत मेहनत, चिकाटी अन् आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचे कसब आत्मसात केल्यास यशाला गवसणी घालणे अशक्य नाही, असा यशमंत्र पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.शासनाच्या मुला-मुलींच्या निरीक्षण व बालगृहाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बाेलत हाेते. उंटवाडी रोडवरील संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

व्यासपीठावर नाशिकच्या प्रांत आयएएस वर्षा मीना, जीएसटी लवादाचे न्यायाधीश सुमेर काले, संस्थेचे मानद सचिव तथा ‘भ्रमर’चे संपादक चंदुलाल शाह, बालकल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बाबर उपस्थित होते.संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. चेतन बंब यांनी संस्थेसाठी दोन मोठ्या सतरंज्या भेट दिल्या. सूत्रसंचालन प्रा. सुनील रुणवाल यांनी केले. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...