आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॉलची उभारणी पूर्णत्व:नरेडकोच्या होमथॉन प्रदर्शनाची जय्यत तयारी ; सकाळी 10 ते रा. 9 प्रदर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत होमथॉन प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून स्टॉलची उभारणी पूर्णत्वाकडे आहे.

या प्रदर्शनात १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंतची घरे नागरिकांना खरेदी करण्याची संधी आहे. प्रदर्शनातील कोणत्याही स्टाॅलवर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांनाही लकी ड्रॉद्वारे एक भेट मिळेल. प्रदर्शनासाठी सहप्रायोजक सिटी लिफ्ट, इन्व्हेरो, केनेस्ट हे असून गृहकर्जासांी युनियन बँक ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदींतर्फे कर्ज सुविधा दिली जाईल.

प्रदर्शनात नागरिकांना मोफत प्रवेश प्रदर्शनाला भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. मात्र प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांना क्यूआर कोडद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल. डोंगरे वसतिगृह मैदानावर हे प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबरपर्यंत नागरिकांना खुले आहे.

बातम्या आणखी आहेत...