आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसारा अन् भोर घाटात वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी:10 फेब्रुवारीपासुन मुंबई ते शिर्डी अन् मुंबई ते सोलापूर धावणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात नागपुर ते बिलासपुर आणि मुंबई ते गांधीनगर या दोन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत असुन येत्या 10 फेब्रुवारीपासुन मुंबई ते साईनगर (शिर्डी) आणि मुंबई ते सोलापूर या दोन्ही मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार असुन वंदे भारत एक्सप्रेसची शनिवारी (दि.4) रोजी कसारा आणि भोर घाटात यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. कसारा घाटात चढ आणि उतार असल्याने पुश आणि पुल साठी याठिकाणी डबल रेल्वे इंजिन लावावे लागत होते. वंदे भारत एक्सप्रेसला इंजिन लावण्याची गरज रहाणार नाही.त्याचीच चाचणी शनिवारी घेण्यात आली.

मुंबई आणि शिर्डी यातील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा उपयोग होणार असुन सहा तास लागणार आहे. या एक्सप्रेसला 16 डबे असुन 1 हजार 128 प्रवासी क्षमता आहे. कसारा आणि भोर घाटातुन रेल्वेला प्रवास करण्यासाठी मागे व पुढे इंजिन लावले जात होते. परंतू वंदे भारत एक्सप्रेसला बँकर जोडण्याची गरज नाही. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. याच धर्तीवर लोकलला इंजिन बसविण्यात आले तर मुंबई ते नाशिक लोकल प्रवास देखील सुलभ होण्याची शक्यता असल्याचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी सांगितले. त्यामुळे चाकरमानी यांच्या प्रवासाची गैरसोय दूर होवून रेल्वे ला देखील महसूल प्राप्त होवू शकेल अशी आशाही व्यक्त केली.

वंदे भारत एक्सप्रेस हे राहणार थांबे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड

बातम्या आणखी आहेत...