आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो लिटर शुद्ध पाणी वाया:प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा असा अपव्यय

सिडको8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोला पाणीपुरवठा करणारी व उंटवाडी पुलाखालून गेलेल्या जलवाहिनीतून माेठे फवारे उडून प्रक्रिया केलेले लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे. यावर मात्र तांत्रिकदृष्ट्या जलवाहिनी धुण्यासाठी जादा पाणी साेडले असल्याचा अजब दावा पाणीपुरवठा अधिकारी करत आहेत.

बाराबंगला जलवाहिनीतून ४५० एमएम डाय मीटरची उंटवाडी पुलाच्या खालून जाणारी जलवाहिनी पवननगर व सावतानगर जलकुंभाला पाणीपुरवठा करते. या जलकुंभातून तब्बल दीड ते दोन लाख नागरिकांना पाणीपुरवठा होतो. ही वाहिनी फुटल्याने या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत आहे. या प्रकारामुळे या भागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

ही नियमित प्रक्रिया
अनेकवेळा जलवाहिनी रासायनिक द्रव्याद्वारे स्वच्छ करावी लागते तेव्हा पाण्याचे व्हाॅल्व साेडावे लागतात. स्वच्छ पाण्यासाठी हे नियमीत करावेच लागते.
गोकुळ पगारे, पाणीपुरवठा अधिकारी, मनपा

बातम्या आणखी आहेत...