आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:रो हाऊसला अचानक आग; तरुणाचा भाजल्याने मृत्यू

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रोडवरील एका रो हाऊसला अचनाक लागलेल्या आगीत तरुणाचा जळून मृत्यू झाला. रविवारी (दि. २०) सायंकाळी ५ वाजता हॅप्पी होम कॉलनीतील राजगुरू रो हाऊस येथे ही धक्कादायक घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने परिसरात आग पसरली नाही.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; शोध सुरूप्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरात तरुण झोपलेला होता. मात्र त्याला अआग लागली हे कळले नाही. त्याचा झोपेतच जळून मृत्यू झाल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. तरुणाने आग लावून घेत स्वत:ला जाळून घेतले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...