आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा मंजूर‎:केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या‎ अध्यक्षपदी सुदेश आहेर अविराेध‎

नाशिक‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट‎ असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुदेश‎ आहेर यांची अविराेध निवड‎ करण्यात आली. जिल्हा संघटनेच्या‎ नियुक्तीवेळी सर्वानुमते योगेश‎ बागरेचा यांची निवड केली होती.‎ मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने‎ त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा‎ दिला हाेता.‎ जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत‎ बागरेचा यांचा राजीनामा मंजूर‎ करण्यात आला. व्यासपीठावर‎ जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव‎ किरण छाजेड, उपाध्यक्ष अतुल‎ जाधव, गणेश निकम, खजिनदार‎ नितीन वालखेडे, गोरख चौधरी‎ राज्य फार्मसी कौन्सिलचे सदस्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अतुल अहिरे आदी उपस्थित होते.‎ सुदेश आहेर यांनी मनोगत व्यक्त‎ करताना पद स्वीकारणे फार सोपे‎ असते.

मात्र पदाला न्याय देण्यासाठी‎ करावे लागणारे परिश्रम फार‎ अवघड असतात. रिटेल, होलसेल‎ फार्मासिस्टच्या प्रश्नांची चांगली‎ जाण आहे. त्यामुळे मी नक्कीच‎ सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय‎ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असा आशावाद व्यक्त केला.‎ यावेळी संघटनेचे सहसचिव सचिन‎ वाळुंज, रामदास गव्हाणे, रत्नाकर‎ वाणी, बापु काळे, सचिन महाले,‎ नितीन देवरगांवकर, मनाेज थोरात,‎ बापू महामने, महेश भावसार, गिरीश‎ महाजन, संजय अमृतकर उपस्थित‎ होते. प्रास्तविक अतुल अहिरे यांनी‎ केले. प्रवीण भदाणे अध्यक्षपदाच्या‎ सूचनेस अनुमाेदन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...