आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीयात्रेचे आयोजन:नदीयात्रेतून गोदेला वगळल्याने आत्मक्लेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने चला जाणूया नदीला या अभियानातून गोदावरी नदीला वगळल्याने या विरोधात रामकुंडावर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या उपनद्या यांचे जल अमृत व्हावं यासाठी नदीयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यात गोदावरीला स्थान दिलेले नाही.

शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र जागतिक अोळख असलेल्या १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा ज्या नदीच्या काठावर होतो, अशा पवित्र गोदावरी नदीचा समावेश या नदी यात्रेच्या यादीमध्ये केलेला नाही. गोदाप्रेमी संघटनांकडून शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्याप शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश शासकीय अध्यादेशामध्ये केलेला नाही. हा गोदावरी आणि नाशिककरांवर अन्याय आहे.

याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साधू-महंत, पुरोहित संघ, सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी यांच्या वतीने शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत रामकुंडावर आत्मक्लेश करण्यात आले.

याप्रसंगी पंचवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले.या आंदाेलनात महंत भक्तिचरणदास महाराज, महंत राजाराम महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, निशिकांत पगारे, काँ. राजू देसले, एनजीओ फोरमचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, नंदिनी नदीचे प्रा. सोमनाथ मुठाळ, वरूना नदीचे सुनील परदेशी, राहुल जोरे , वीरेंद्र टिळे, रोहित कानडे, आळंदी नदीचे तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे, सुरेश भोर, डॉ अजय कापडणीस, योगेश कापसे , जगबिर सिंग, सुरेंद्र बोरसे, वैशालीताई चव्हाण, भारतीताई जाधव व मंगल पिसे आदी सहभागी झाले हाेते.

आंदोलनकर्ते ताब्यात : शहरात जमावबंदी आदेश लागू आहेत. विनापरवानगी आंदोलन केल्याने पंचवटी पोलिसांनी गोदाप्रेमींना ताब्यात घेत चौकशी करून सुटका केली.

तर कलश शासनाला परत केले जाणार
नदी यात्रेसाठी उपनद्यांना जे कलश देण्यात आलेले आहेत. ते सर्व कलश लवकरच शासनाला परत केले जातील.- निशिकांत पगारे, गोदावरी नदी संवर्धन समिती नाशिक

बातम्या आणखी आहेत...