आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाशिक:ऊसतोड कामगारांच्या संपाचा प्रश्न शरद पवारांच्या कोर्टात, साखर कारखानदार-संघटनेतील बोलणी निष्फळ

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साखर संघाने सुचवल्यास पवारांसोबत चर्चेला तयार

मजुरी, वाहतूक खर्च आणि कमिशन वाढीच्या मुद्द्यावरून गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील ऊसतोड कामगारांचा संप चिघळला असून ऊसतोड कामगार संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील तीन बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी मध्यस्थी करावी, अशी गळ घालण्यात आली आहे.

लवाद नको पण दरवाढ आणि सुरक्षा हवी ही भूमिका सर्व संघटनांनी मांडली आहे. याबाबतचा प्रस्ताव साखर संघाने द्यावा अशी संघटनांची मागणी आहे. या वाढीबाबत साखर संंघ सकारात्मक असल्याची भूमिका अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी घेतली. मात्र प्रस्ताव सादर करण्याचा चेंडू संघटनांच्याच अंगणात टोलवला. त्यामुळे संघासोबतच्या तीन बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही. अतिरिक्त साखर, आर्थिक संकटामुळे कामगारांचे वेतन आणि शेतकऱ्यांची थकबाकी यात अडकलेल्या साखर उद्योगांपुढील आव्हान या संपामुळे वाढले आहे.

साखर संघाने सुचवल्यास पवारांसोबत चर्चेला तयार

गेल्या सहा वर्षांतील चलन दरवाढ पाहता आमची मागणी न्याय्य आहे. शेजारी प्रत्येक राज्यात महाराष्ट्रापेक्षा अधिक दर आहेत. साखर संघाने वाढीव दरांचा प्रस्ताव ठेवावा, आम्ही सर्व संघटना आपसात चर्चा करून निर्णय घेऊ. संघाने सुचवल्यास पवारांसोबत बैठकीस तयार आहोत. - डॉ. डी. एल. कराड, अध्यक्ष, महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक संघटना

या आहेत मागण्या

> ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार यांची नोंद व्हावी, ओळखपत्र व सेवा पुस्तिका मिळाव्यात

> बांधकाम क्षेत्राप्रमाणे साखर उद्योगांवर सेस लावून त्यातून यांच्यासाठी कल्याणकारी सेवा द्याव्यात

> ऊसतोड मजूर, वाहतूकदार महामंडळ स्थापन करावे

> विम्याचा हप्ता राज्य सरकार, कारखाना किंवा महामंडळाने भरावा.