आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका आयुक्तांकडून पाहणी:गाेदावरीचे प्रदूषण राेखण्यासाठी ठाेस उपाययाेजना करण्याची सूचना

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरीचा प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता याबाबत उच्च न्यायालयाने समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या वतीने गाेदाघाट परिसराचा पाहणी दाैरा झाला. यावेळी मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून साेडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण हाेणारा फेस याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. या सर्व तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रदूषण राेखण्यासंदर्भात तातडीने ठाेस उपाययाेजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणी दाैऱ्याच्या वेळी निरीचे नितीन गोयल, याचिकाकर्ता निशिकांत पगारे, राजेश पंडित, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटी अधिकारी सुमंत मोरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संतोष मोहरे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...