आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकमंत्रिपद दादा भुसे यांच्याकडे गेल्यानंतर नाशकात शिंदे गटाचा विस्तार हाेईल अशी अपेक्षा फाेल ठरताना दिसत असून शिंदे गटाच्या कारभाराचा अंदाजच येत नाही. तसेच आपल्याला महत्व दिले जात नाही असा गाैप्यस्फाेट नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी केल्यामुळे वादळ उठले आहे. कांदे यांनी थेट काेणावरही आराेप केले नसले तरी, त्यांचा एकुणच सुरू भुसे तसेच खासदार हेमंत गाेडसे यांच्याविराेधात असल्याचे लपून राहीलेले नाही. दरम्यान, शिंदे गटाची नाराज आता भाजप व उद्धव सेनेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ,ऐतहासिक बंड घडवून आणले. या बंडात सहभागी पहिल्या सात आमदारांमध्ये सुहास कांदे यांचे नाव हाेते. कांदे यांनी थेट उद्धव व आदित्य ठाकरे यांच्याविराेधात आराेपाची ताेफ डागली हाेती. कांदे यांची आक्रमक व दबंग आमदार म्हणून राज्यभरात प्रतिमाही तयार झाली.
यामुळे वाढला गाेडसेंना विराेध..
शिवसेनेत अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना हेमंत गाेडसे हे पक्षीय राजकारणापासून दूर हाेते. मात्र शिंदे गटात आल्यानंतर त्यांनी शहराची सूत्रे हातात घेतली आहे. शिंदे गटातील अनेक नेते नाराज असून त्याचे कारण म्हणजे, शिंदे गटाचे कार्यालय हे गाेडसे यांच्या वैयक्तिक कार्यालयाशेजारी ठेवले गेले. हे कार्यालय रस्त्यासन्मुख ठेवले असते तर अधिक प्रभाव दिसला असता अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.
सहाशे काेटीची स्थगितीमुळे भुसेंविराेधात नाराजी
कांदे यांनी तक्रार केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा नियाेजन समितीच्या सर्वसाधारण याेजनेच्या सहाशे काेटीच्या कामांना स्थगिती दिली मात्र ही स्थगिती पालकमंत्री नियुक्तीनंतर लगेच उठली मात्र जवळपास दाेन महिन्यापासून नवीन कामांचे नियाेजन झालेले नाही. त्यात शिंदे गटाच्या प्रमुखांनाच किंबहुना भाजप आमदारांनाही अमूक-अमूकला भेटा असे कथित निराेप येत असल्यामुळे नाराजी वाढली आहे.
कांदे आणि नाराजीचे समीकरण
आक्रमक अशी प्रतिमा असली तरी, कांदे व नाराजी हे समीकरण प्रत्येकवेळी दिसून आली. मनसे, राष्ट्रवादी ते शिवसेना असा प्रवास केल्यानंतर प्रत्येकठिकाणी त्यांचे काेणाशीही जमले नाही असे अनेकवेळा दिसून आले. शिवसेनेत असताना त्यांनी आपलेच सरकार असताना उघड बंड केले हाेते. दरम्यान, कांदे यांच्या नाराजीचा भाग हा ताेंडावर असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरील दबावतंत्राचा भाग तर नाही ना अशीही चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.